पंतप्रधान रोजगार निर्मिती (PMEGP)

 पंतप्रधान रोजगार निर्मिती (PMEGP) योजनेंतर्गंत कर्जाचा अर्ज कसा कराल, कोणती कागदपत्रे आवश्यक? वाचा सविस्तर

नमस्कार मित्रांनो आपण या लेखामध्ये प्रधानमंत्री रोजगार निर्मिती म्हणजेच (PMEGP)साठी कोण अर्ज करू शकतो हे बघणार आहोत. मित्र हो शासनाच्या कोणत्याही योजनेमध्ये मध्ये वेळोवेळी बदल होत असतात. त्यामुळे आपण संबधित कार्यालयाच्या अधिकार्यांसोबत व OFFICIAL संकेत स्थळासोबत CONNECT राहणे महत्वाचे असते.सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसाय उभा करण्यासाठी शासन अशा योजनांद्वारे मदत करत असते.

ज्यांना खरच व्यवसाय करायचा आहे. त्या लोकांनीच या योजनेमध्ये सहभाग घ्यावा.काही लोक फक्त SUBSIDY साठी योजनेत सहभाग घेतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी CIBIL SCORE चांगला असणे आवश्यक आहे. आपण संबधित बँकेला आपला स्पॉट जागा योग्य लोकेशन वर असणे पण गरजेचे आहे.

केंद्र शासनाच्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (Prime Minister Employment Generation Program) ही नवीन योजना लागू केली असून, या योजनेची अंमलबजावणी खादी ग्रामोद्योग आयोग, खादी ग्रामोद्योग बोर्ड यांचे कार्यालयामार्फत ग्रामीण भागामध्ये व जिल्हा उद्योग केंद्रामार्फत शहरी व ग्रामीण भागात केली जात आहे. प्रत्येक जिल्ह्यात बेरोजगारांसाठी ही योजना राबविण्यात येते.

पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेची ठळक वैशिष्ट्ये –

  • २५ लाखांपर्यंत गुंतवणुकीचे उद्योग तथा १० लाख पर्यंतच्या व्यवसाय सेवा घटक प्रकल्पांना ९० ते ९५ टक्के कर्ज राष्ट्रीयीकृत बँका तथा विभागीय ग्रामीण बँका, आयडीबीआय मार्फत उपलब्ध होते.
  • उर्वरित ५ ते १० टक्के रक्कम अर्जदारास भरावी लागते. एकूण कर्जापैकी सर्वसाधारण गटातील उमेदवाराला शहरी भागात १५ टक्के व ग्रामीण भागात २५ टक्के मार्जिन मनी अनुदान प्राप्त होते.
  • तथा विशेष गटातील उमेदवाराला शहरी भागात २५ टक्के व ग्रामीण भागात ३५ टक्के मार्जिन मनी अनुदान प्राप्त होते. विशेष गटात अनुसूचित जाती/जमाती, इतर मागास वर्ग, अल्पसंख्यांक, महिला, अपंग उमेदवार, माजी सैनिक यांचा समावेश होतो.
  • वय अठरा वर्षे पूर्ण असलेला उमेदवार पात्र असून उत्पन्नाची अट नाही. तथापि ५ लाखापेक्षा अधिक गुंतवणुकीचे व्यापार सेवा घटकासाठी, तसेच १० लाखापेक्षा अधिक गुंतवणुकीच्या उद्योग प्रकल्पासाठी शिक्षण आठवी वर्ग पास अन्यथा शिक्षणाची अट नाही.

पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेची उदिष्ट्ये –

·  स्वयं रोजगाराच्या नव्या उद्योगांमार्फत/परियोजनातून/सूक्ष्म उद्योगाच्या माध्यमातून देशातील शहरी क्षेत्रांबरोबरच ग्रामीण क्षेत्रात देखील रोजगाराची हमी देणे.

·  पारंपारिक/ ग्रामीण आणि शहरी कारागीरांना व बेरोजगार तरुणांना व्यापक स्वरुपात एकत्र आणणे आणि त्यांना यथासंभव त्यांच्या जागेतच स्वयंरोजगार मिळवून देणे.

·  पारंपारिक/ग्रामीण आणि शहरी कारागीरांना व बेरोजगार तरुणांना कायमस्वरुपी आणि टिकाऊ असा स्वयंरोजगार देणे, जेणेकरुन त्या गावातील तरुण लोक शहराकडे जाणे टाळतील.

पारंपारिक कामगारांची पैसे मिळवण्याची क्षमता वाढविणे आणि तसेच ग्रामीण आणि शहरातील बेरोजगारांची संख्या कमी करणे आणि त्याच्या विकासात वाढ करणे.

पीएमईजीपी योजनेंतर्गत कोणत्या व्यवसायासाठी कर्ज दिले जाते.

  • पीएमईजीपी कर्ज खालील क्षेत्रातील उद्योगांसाठी दिले जाते:
  • कृषी आधारित अन्न प्रक्रिया
  • वन-आधारित उत्पादने
  • हाताने तयार केलेला कागद आणि फायबर
  • खनिज-आधारित उत्पादने
  • पॉलिमर आणि केमिकल-आधारित उत्पादने
  • ग्रामीण अभियांत्रिकी आणि बायो-टेक
  • सेवा आणि वस्त्र

 

PMEGP कर्जासाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • आधार कार्ड
  • पॅनकार्ड
  • बँक पासबुक
  • अर्जदाराची ओळख आणि पत्त्याचे पुरावे उदा.जागेचा 8 अ, शहरी भाग असल्यास असेसमेंट नक्कल.
  • शाळा सोडण्याचा दाखला
  • जातीचा दाखला असल्यास
  • उद्योजक विकास कार्यक्रम (EDP) प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असल्यास
  • SC/ST/OBC/अल्पसंख्याक/माजी सैनिक/PHC साठी प्रमाणपत्र असल्यास
  • शैक्षणिक आणि तांत्रिक अभ्यासक्रमांचे प्रमाणपत्र, असल्यास
  • बँक किंवा NBFC द्वारे आवश्यक असलेले इतर कोणतेही दस्तऐवज
  • लोकसंखेचा दाखला
  • प्रकल्प अहवाल
  • राशन कार्ड
  • घर TAX पावती
  • इलेक्ट्रिक बिल
  • 7/12, 8 जमिनीचाअसल्यास
  • अनुभव प्रमाणपत्र असल्यास संबधित व्यवसायामध्ये
  • प्रशिक्षण प्रमाणपत्र कॉम्पुटर उदा. (MS-CIT, CCC इत्यादी).
  • क्रेडीट रिपोर्ट (CIBIL SCORE)
  • ITR (INCOME TAX RETUREN) असल्यास
  • पॉलिसी पावती असल्यास (उदा.LIC इत्यादी)
  • आधार लिंक मोबाईल नंबर
  • ई-मेल
  • यातील जास्तीत जास्त कागदपत्रे असल्यास आपणास चांगला स्कोर मिळतो.
  • PMEGP ई-पोर्टल अर्जदारांना PMEGP नोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठीhttps://www.kviconline.gov.in/pmegp.jsp येथे अर्ज ऑनलाइन भरून आणि सबमिट करून प्रवेश प्रदान करता येतो.

कर्ज परतफेडीचा कालावधी

  • बँक कर्ज परतफेडीचा कालावधी ३ ते ७ वर्षापर्यंतचा असतो. बँक कर्जाचा व्याजदर प्रचलित दराप्रमाणे (Normal interest) असतो.
  • कर्ज मंजूरीनंतर व वाटपापूर्वी लाभार्थ्याने संबंधित व्यवसायाचे उद्योजकीय प्रशिक्षण (EDP Training) घेतलेले असणे अनिर्वाय आहे.
  • लाभार्थ्यास कर्जाचा पहिला हप्ता वाटप केल्यानंतर नोडल बँकेत मार्जिन मनी अनुदानासाठी केस पाठविले जाते.
  • त्यानंतर अनुदानीत अमाऊंट नोडल बँकेकडून कर्ज देणा-या बँकेस वितरीत करण्यात येते.
  • वितरीत करण्यात आलेले अनुदान लाभार्थीचे नांवे ३ वर्षाकरिता टर्म डिपॉझिट रिसीट मध्ये डिपॉझिट करण्यात येते.
  • तीन वर्षानंतर आवश्यक ती खात्री केल्यानंतर अनुदानीत रक्कम कर्ज खात्यात पाठवली जाते.
  • याप्रकारे लाभार्थीस त्याच्या उद्योग व्यवसायासाठी कर्ज सुविधा तसेच अनुदान सुविधा उपलब्ध करण्यात येते.

अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करा.

सिद्धविनायक ऑनलाईन मल्टीसर्व्हिसेस चिखली.(बुलडाणा)

प्रो.प्रा. संतोष विक्रम मोरे

मो.नंबर- 9579236206

ई-मेल- santoshmorey77@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत website नाही किंवा कोणत्याही शासनाच्या योजनेशी संबधित नाही,कृपया याला official website म्हणून मानु नका.या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवाअधिकार्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो.धन्यवाद..

पंतप्रधान रोजगार निर्मिती (PMEGP)

  पंतप्रधान रोजगार निर्मिती (PMEGP) योजनेंतर्गंत कर्जाचा अर्ज कसा कराल , कोणती कागदपत्रे आवश्यक ? वाचा सविस्तर नमस्कार मित्रांनो आपण या ले...