पंतप्रधान रोजगार निर्मिती (PMEGP)

  पंतप्रधान रोजगार निर्मिती (PMEGP) योजनेंतर्गंत कर्जाचा अर्ज कसा कराल , कोणती कागदपत्रे आवश्यक ? वाचा सविस्तर नमस्कार मित्रांनो आपण या लेखामध्ये प्रधानमंत्री रोजगार निर्मिती म्हणजेच (PMEGP)साठी कोण अर्ज करू शकतो हे बघणार आहोत. मित्र हो शासनाच्या कोणत्याही योजनेमध्ये मध्ये वेळोवेळी बदल होत असतात. त्यामुळे आपण संबधित कार्यालयाच्या अधिकार्यांसोबत व OFFICIAL संकेत स्थळासोबत CONNECT राहणे महत्वाचे असते.सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसाय उभा करण्यासाठी शासन अशा योजनांद्वारे मदत करत असते. ज्यांना खरच व्यवसाय करायचा आहे. त्या लोकांनीच या योजनेमध्ये सहभाग घ्यावा.काही लोक फक्त SUBSIDY साठी योजनेत सहभाग घेतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी CIBIL SCORE चांगला असणे आवश्यक आहे. आपण संबधित बँकेला आपला स्पॉट जागा योग्य लोकेशन वर असणे पण गरजेचे आहे. केंद्र शासनाच्या सुक्ष्म , लघु व मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ( Prime Minister Employment Generation Program) ही नवीन योजना लागू केली असून , या योजनेची अंमलबजावणी खादी ग्रामोद्योग आयोग , खादी ग्रामोद्योग बोर्ड यांचे...

प्रधानमंत्री खरीप फसल विमा योजना 2025 बदल,दर,कागदपत्रे वाचा सविस्तर.


 

प्रधानमंत्री खरीप फसल विमा योजना 2025

बदल,दर,कागदपत्रे वाचा सविस्तर.    

काय आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना?

 नमस्कार आपण या लेखामध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना बद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत.             प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) ही भारत सरकारने सुरु केलेली एक कृषी [शेती संदर्भात] असलेली विमा योजना आहे. या फसल विमा  योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, रोग, कीड, अवकाळी पाऊस, गारपीट इत्यादीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण देणे आहे.

योजनेचे प्रमुख उद्दिष्ट

1] पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करणे

2]शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणे

3]शेती व्यवसायाला प्रोत्साहन देणे

4]शेती उत्पन्नात स्थिरता आणणे

  2025 मध्ये होणारे संभाव्य बदल 

1]विमा प्रक्रिया अधिक डिजिटल होणार

2]नुकसान भरपाई जलद मिळणार

3]विमा भरतीची प्रक्रिया सुलभ होणार 

4]रिमोट सेंसिंग व ड्रोनद्वारे नुकसानीचे मूल्यांकन

5] कमी कागदपत्रे, थेट बँक खात्यात भरपाई

 कोण पात्र आहे?

  • सर्व च शेतकरी 

  • कोणतीही पिके घेणारे शेतकरी

  • संबंधित राज्यात पिकवले जाणारे घोषित पिक असणे आवश्यक

  • संबंधित बँकेत खाते असणे आवश्यक

 कोणती पिके विम्याखाली येतात?

खरीप पिके

 (उदा. भात, बाजरी, सोयाबीन)

विमा हप्त्याचे दर 2025 

1] सोयाबीन- 1160 रुपये

2]कपाशी- 900 रुपये

3]तूर- 470 रुपये

4]मक्का-90 रुपये

5]मुग-70 रुपये

6]उडीद- 62 रुपये

7]ज्वारी- 82 रुपये

2025 खरीप पिक विमा भरण्याला सरुवात दिनांक 1जुलै 2025 अंतिम दिनांक-31 जुलै 2025

अर्ज कसा करावा?

1]CSC सेंटर वर

2]https://pmfby.gov.in/ किंवा या संकेतस्थळावर       

महत्त्वाचे कागदपत्रे:

1] 7/12 उतारा

2]आधार कार्ड

3]बँक पासबुक

4] शेतकरी ओळखपत्र[ फार्मर आयडी]     

🔹 भरपाई कधी मिळते?

  • पिक नुकसानीचे सर्वेक्षण झाल्यानंतर

  • सरकारकडून मंजूरी मिळाल्यावर

  • शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट भरपाई जमा केली जाते

      *योजनेचे फायदे

  • शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षितता

  • पिकांचे नुकसान भरून निघते

  • आत्महत्यांचे प्रमाण कमी होणे

  • शेतीमध्ये गुंतवणूक वाढते

  • नैसर्गिक संकटांपासून बचाव

अधिक माहिती व संपर्क

अधिकृत वेबसाइट:  

https://pmfby.gov.in

टोल फ्री क्रमांक: 1800-180-1111 / 1800-103-2016

कृषी विभाग कार्यालय / जवळचे CSC केंद्र.

                             धन्यवाद..... 

 

            

 

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत नाविन्यपूर्ण योजना आणि जिल्हास्तरीय योजना याअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

पिक विमा खरीप 2025 पिक विमा भरण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य.