पोस्ट्स

पंतप्रधान रोजगार निर्मिती (PMEGP)

  पंतप्रधान रोजगार निर्मिती (PMEGP) योजनेंतर्गंत कर्जाचा अर्ज कसा कराल , कोणती कागदपत्रे आवश्यक ? वाचा सविस्तर नमस्कार मित्रांनो आपण या लेखामध्ये प्रधानमंत्री रोजगार निर्मिती म्हणजेच (PMEGP)साठी कोण अर्ज करू शकतो हे बघणार आहोत. मित्र हो शासनाच्या कोणत्याही योजनेमध्ये मध्ये वेळोवेळी बदल होत असतात. त्यामुळे आपण संबधित कार्यालयाच्या अधिकार्यांसोबत व OFFICIAL संकेत स्थळासोबत CONNECT राहणे महत्वाचे असते.सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसाय उभा करण्यासाठी शासन अशा योजनांद्वारे मदत करत असते. ज्यांना खरच व्यवसाय करायचा आहे. त्या लोकांनीच या योजनेमध्ये सहभाग घ्यावा.काही लोक फक्त SUBSIDY साठी योजनेत सहभाग घेतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी CIBIL SCORE चांगला असणे आवश्यक आहे. आपण संबधित बँकेला आपला स्पॉट जागा योग्य लोकेशन वर असणे पण गरजेचे आहे. केंद्र शासनाच्या सुक्ष्म , लघु व मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ( Prime Minister Employment Generation Program) ही नवीन योजना लागू केली असून , या योजनेची अंमलबजावणी खादी ग्रामोद्योग आयोग , खादी ग्रामोद्योग बोर्ड यांचे...

🐓 कुक्कुटपालन व्यवसाय माहिती..

इमेज
    🐓 कुक्कुटपालन व्यवसाय माहिती.. नमस्कार मित्रांनो आपण आज या लेखामध्ये कुक्कुटपालन व्यवसाय बद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. मित्रांनो  भारत हा कृषी प्रधान देश आहे. आपल्या देशात लोक शेतीसोबत शेतीला  पूरक व्यवसाय करत असतात. या पूरक व्यवसायामध्ये  कुक्कुटपालन  हा व्यवसाय सर्वात जास्त लोकप्रिय व फायदेशीर मानला जातो. कारण कोंबडीचे मांस व अंडी हे दोन्ही उत्पादने वर्षभर सतत मागणी असलेली आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी, बेरोजगार युवक, महिला तसेच शहरी उद्योजक देखील हा व्यवसाय यशस्वीपणे करत आहेत. कमी गुंतवणुकीत मोठा नफा मिळवून देणारा हा व्यवसाय आज लाखो लोकांच्या रोजगाराचा स्रोत बनला आहे. मित्रांनो महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तमिळनाडू व कर्नाटक ही राज्ये कुक्कुटपालन क्षेत्रात आघाडीवर राज्ये आहेत.शहरी भागात अंडी व मांसाच्या खपात झपाट्याने वाढ झाल्यामुळे या व्यवसायाला चांगली बाजारपेठ उपलब्ध आहे. 💢कुक्कुटपालनाचे काही प्रकार खालीलप्रमाणे आहेत...💢 मित्रांनो  कुक्कुटपालन हा एकच व्यवसाय नाही तर या व्यवसायात विविध पद्धती आहेत.  1.ब्रॉयलर पालन - बॉयलर पालन म्हणजे काय?...

आपल्या जीवनात आरोग्याचे महत्त्व आणि दैनिक निरोगी जीवनशैली..

आपल्या जीवनात  आरोग्याचे महत्त्व आणि दैनिक निरोगी जीवनशैली.. आपल्या शरीराला ऊर्जा देणारा मुख्य स्रोत म्हणजे आपला आहार. संतुलित आहारामध्ये धान्य, डाळी, भाज्या, फळे, दूध, अंडी, मांसाहार (ज्यांना योग्य वाटेल त्यांच्यासाठी) तूप किंवा तेल यांचा समतोल दैनिक आहारात असावा.पालेभाज्या आणि फळे जीवनसत्वे आणि खनिजे देतात.धान्य आणि डाळी प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स पुरवतात.दूध व दुग्धजन्य पदार्थ कॅल्शियमसाठी महत्त्वाचे आहेत. पाणी शरीर शुद्ध ठेवते, त्यामुळे दिवसाला किमान ७-८ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहेच.जास्त  फास्ट फूड, शीतपेये, अधिक तेलकट पदार्थ यांचा वापर कमी करणे हेही तितकेच गरजेचे आहे. 💢नियमित व्यायामाचा सराव..💢 आपल शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम हा सर्वोत्तम उपाय आहे. दररोज ३० ते ४५ मिनिटांचा व्यायाम केला तर हृदयाचे कार्य सुधारते, शरीरातील चरबी कमी होते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.सकाळी सकाळी  चालणे किंवा धावणे तसेच योगासने आणि प्राणायाम सायकलिंग किंवा पोहणे, हे सर्व व्यायाम प्रकार आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. व्यायामामुळे मन प्रसन्न राहते, ताणतणाव कमी होतो आणि झोप उत्तम लागते....

सेंद्रिय शेती – एक उज्वल भविष्याचा राजमार्ग.

इमेज
  💢सेंद्रिय शेती – एक उज्वल भविष्याचा राजमार्ग.💢 मित्रांनो आपण सेंद्रिय शेती बद्दल माहिती या ब्लोग मध्ये बघणार आहोत.मित्र हो आजच्या आधुनिक काळात शेतीत उत्पादन वाढवण्यासाठी शेतकरी रासायनिक खते , कीटकनाशके तसेच  विविध रसायनांचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. सुरुवातीला ही पद्धत उयुक्त आणि फायदेशीर वाटते , कारण पिके लवकर तयार होतात आणि उत्पादन जास्त मिळते. पण मित्रानो हळूहळू त्याचे काही गंभीर परिणाम आपल्याला आपल्या आरोग्यावर दिसू लागतात तसेच जमिनीची सुपीकता हि कमी होते , आणि  पाण्याचे प्रदूषण वाढते आणि माणसांच्या आरोग्यावर दुष्परिणाम आढळून येतात.   मित्र हो या समस्येवर एकमेव पर्याय म्हणजेच सेंद्रिय शेती ( Organic Farming) अशी शेती पद्धत आहे जी कि पूर्णपणे नैसर्गिक साधन संपत्तीवर आधारित असते आणि पर्यावरणाशी सुसंगत असते. चला तर मग मित्र हो  , सेंद्रिय शेतीचे फायदे , पद्धती , अडचणी आणि भविष्यातील महत्त्व जाणून घेऊया. 💥सेंद्रिय शेती म्हणजे नेमक काय ?   सेंद्रिय शेती म्हणजे अशी एक शेती पद्धत ज्यामध्ये रासायनिक खतं , कीटकनाशक किंवा इतर हानिकारक रसायनां...