आपल्या जीवनात आरोग्याचे महत्त्व आणि दैनिक निरोगी जीवनशैली..
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आपल्या जीवनात आरोग्याचे महत्त्व आणि दैनिक निरोगी जीवनशैली..
आपल्या शरीराला ऊर्जा देणारा मुख्य स्रोत म्हणजे आपला आहार. संतुलित आहारामध्ये धान्य, डाळी, भाज्या, फळे, दूध, अंडी, मांसाहार (ज्यांना योग्य वाटेल त्यांच्यासाठी) तूप किंवा तेल यांचा समतोल दैनिक आहारात असावा.पालेभाज्या आणि फळे जीवनसत्वे आणि खनिजे देतात.धान्य आणि डाळी प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स पुरवतात.दूध व दुग्धजन्य पदार्थ कॅल्शियमसाठी महत्त्वाचे आहेत.
पाणी शरीर शुद्ध ठेवते, त्यामुळे दिवसाला किमान ७-८ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहेच.जास्त फास्ट फूड, शीतपेये, अधिक तेलकट पदार्थ यांचा वापर कमी करणे हेही तितकेच गरजेचे आहे.
💢नियमित व्यायामाचा सराव..💢
आपल शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम हा सर्वोत्तम उपाय आहे. दररोज ३० ते ४५ मिनिटांचा व्यायाम केला तर हृदयाचे कार्य सुधारते, शरीरातील चरबी कमी होते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.सकाळी सकाळी चालणे किंवा धावणे तसेच योगासने आणि प्राणायाम सायकलिंग किंवा पोहणे, हे सर्व व्यायाम प्रकार आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. व्यायामामुळे मन प्रसन्न राहते, ताणतणाव कमी होतो आणि झोप उत्तम लागते.
💢शरीरासोबत मानसिक आरोग्य हि महत्वाचे आहे...💢
शरीराच्या बरोबर मनाचे आरोग्य टिकवणेही गरजेचे आहे. सतत चे नकारात्मक विचार, चिंता किंवा राग मनावर ताण आणतात.दररोज ध्यान, श्वसनक्रिया केल्याने मन शांत राहते.निसर्गात वेळ घालवल्याने ताजेतवाने वाटते मन फ्रेश होते.आपल्या छंदांना/विरंगुळा यांना वेळ देणे मानसिक आरोग्यासाठी लाभदायी ठरते.रोज सकारात्मक लोकांच्या सहवासात राहले कि मन प्रसन्न राहते.
💢पुरेशी झोप..💢
धावपळीच्या दैनिक जीवन शैलीतून आरामदायी झोप ही शरीर-मन दोन्हीसाठी औषधासारखी आहे. दिवसाला ७-८ तासांची झोप मिळाली तर शरीराचे थकलेले स्नायू ताजेतवाने होतात. रात्री उशिरा मोबाइल, टीव्ही किंवा कॉम्प्युटरवर वेळ घालवल्यामुळे झोपेचा दर्जा कमी होतो. म्हणूनच ठराविक वेळेवर झोपणे आणि उठणे या सवयी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
💢आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हे हि महत्वाचेच..💢
धावपळीच्या जीवनात रोगांपासून वाचण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे अत्यंतआवश्यक आहे. यामध्ये हळदीचे दूध, लसूण, आल्याचा वापर ताजे फळे जसे की संत्री, लिंबू, पेरू पुरेसा व्यायाम आणि पाणी पिणे हे उत्तम ठरते.
💢निसर्गाशी आपले नाते...💢
आपण आपल्या दैनिक कामातून निसर्गाशी जोडून राहणे खूप महत्वाचे आहे. स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि हरित वातावरण शरीराला ऊर्जा देते. तसेच घराभोवती झाडे लावणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि निसर्गरक्षणासाठी योगदान देणे हे आपले आरोग्य टिकवण्यास मदत करते.
💢दैनिक व्यसनमुक्त जीवन..💢
दारू,तंबाखू, गुटखा, गांजा यांसारख्या व्यसनांचा शरीरावर घातक परिणाम होतो. ही व्यसने केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आणि आर्थिक आरोग्यालाही हानी पोहोचवतात. त्यामुळे व्यसनांपासून दूर राहणे हीच खरी जीवनशैली आहे...आपले आरोग्य टिकवण्यासाठी विशेष म्हणजे मोठ्या गोष्टी करण्याची गरज नाही. फक्त संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, सकारात्मक विचार आणि निसर्गाशी नाते ठेवणे हे पाच नियम पाळले तरी जीवन निरोगी आणि आनंदमय होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत website नाही किंवा कोणत्याही शासनाच्या योजनेशी संबधित नाही,कृपया याला official website म्हणून मानु नका.या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवाअधिकार्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो.धन्यवाद..