सेंद्रिय शेती – एक उज्वल भविष्याचा राजमार्ग.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

💢सेंद्रिय शेती – एक उज्वल भविष्याचा राजमार्ग.💢

💢सेंद्रिय शेती – एक उज्वल भविष्याचा राजमार्ग.💢
मित्रांनो आपण सेंद्रिय शेती बद्दल माहिती या ब्लोग मध्ये बघणार आहोत.मित्र हो आजच्या आधुनिक काळात शेतीत उत्पादन वाढवण्यासाठी शेतकरी रासायनिक खते, कीटकनाशके तसेच विविध रसायनांचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. सुरुवातीला ही पद्धत उयुक्त आणि फायदेशीर वाटते, कारण पिके लवकर तयार होतात आणि उत्पादन जास्त मिळते. पण मित्रानो हळूहळू त्याचे काही गंभीर परिणाम आपल्याला आपल्या आरोग्यावर दिसू लागतात तसेच जमिनीची सुपीकता हि कमी होते, आणि पाण्याचे प्रदूषण वाढते आणि माणसांच्या आरोग्यावर दुष्परिणाम आढळून येतात.
मित्र हो या समस्येवर एकमेव पर्याय म्हणजेच सेंद्रिय शेती (Organic Farming) अशी शेती पद्धत आहे जी कि पूर्णपणे नैसर्गिक साधन संपत्तीवर आधारित असते आणि पर्यावरणाशी सुसंगत असते. चला तर मग मित्र हो , सेंद्रिय शेतीचे फायदे, पद्धती, अडचणी आणि भविष्यातील महत्त्व जाणून घेऊया.
💥सेंद्रिय शेती म्हणजे नेमक काय?
सेंद्रिय शेती म्हणजे अशी एक शेती पद्धत ज्यामध्ये रासायनिक खतं, कीटकनाशक किंवा इतर हानिकारक रसायनांचा वापर केला जात नाही. त्याऐवजी शेणखत, गांडूळखत, हिरवळीचे खत, पिकांचे अवशेष, जैविक कीटकनाशके आणि सूक्ष्मजीव आधारित खते वापरली जातात.
यामध्ये निसर्गाच्या चक्राचा आदर केला जातो आणि माती, पाणी आणि हवा यांचा समतोल राखून शेती पिके घेतली जातात.
💥सेंद्रिय शेतीचे फायदे काय?
१. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवली जाते.
रासायनिक खतांमुळे जमिनीतील सूक्ष्मजीव नष्ट होतात. पण सेंद्रिय खते वापरल्यास मातीतील जीवजंतू सक्रिय राहतात आणि मातीला नैसर्गिक पद्धतीने सुपीकता मिळत असते.
२.उत्तम आरोग्यासाठी सुरक्षित अन्न..
सेंद्रिय शेतीत रसायनांचा वापर नसल्यामुळे पिके हि विषमुक्त राहतात आणि अशा धान्य, फळं-भाज्या खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि दीर्घकालीन आजारांचा धोका हा कमी होतो.
३. पर्यावरणपूरक शेती..
सेंद्रिय शेत पद्धतीमुळे पाणी व मातीचे प्रदूषण कमी होते तसेच जैवविविधता टिकून राहते आणि पक्षी, मधमाशा आणि उपयुक्त कीटक यांना अनुकूल वातावरण हे मिळते.
४. पिकांची चांगली गुणवत्ता सुधारते.
सेंद्रिय पद्धतीने घेतलेली पिकं हि खायला चविष्ट व पौष्टिक असतात. तसेच अशा पिकांना बाजारात अधिक मागणी असते आणि शेतकऱ्याला चांगला दर यामधून मिळतो.
५. सेंद्रिय शेती कमी खर्चिक शेती..
शेतीसाठी लागणारे खते आणि औषध हि शेतातच तयार केली जाते. त्यामुळे शेतकऱ्याचा खर्च कमी होतो आणि नफा हा वाढतो.
💥सेंद्रिय शेतीची काही प्रमुख पद्धती.
१. शेणखत व गांडूळखत यांचा वापर करून
शेणखत तसेच कंपोस्ट खत, गांडूळखत हे मातीसाठी सर्वोत्तम खतं आहेत. यामुळे माती हलकी होते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता हि मातीची वाढते.
२. हिरवळीचे खत...
जमिनीत शेणखतासोबत नायट्रोजन पुरवणारी पिकं (उदा. सून हेम्प, ढोबळी, मूग, उडीद) पिकवून ती जमिनीत मिसळली जातात. आणि यामुळे मातीतील सेंद्रिय घटक वाढतात.
३. जैविक कीटकनाशके..
निंबोळी अर्क, लसूण अर्क, दुधी तंबाखू अर्क, दशपर्णी अर्क यांसारखी नैसर्गिक औषधे वापरून कीड व रोग नियंत्रण केले जातात
४. पीक फेरपालट..
एकाच जमिनीत वेगवेगळी पिकं वेगवेगळ्या हगामात घेतली जातात. यामुळे मातीतील पोषणतत्वांचा समतोल राखला जातो.
💥सेंद्रिय शेती करताना येणाऱ्या अडचणी..
1.सेंद्रिय शेती करताना सुरुवातीला उत्पादन कमी मिळते व माती नैसर्गिक स्थितीत यायला वेळ लागतो.
2. पिके घेतल्या नंतर बाजारपेठेचा अभाव हा बघायला मिळतो .अजूनही सर्वत्र सेंद्रिय उत्पादनांची खात्रीशीर बाजारपेठ उपलब्ध नाहीये.
3.सेंद्रिय शेती करताना जास्त मेहनत लागते आणि रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेतीत जास्त नियोजन आणि काम कराव लागत.
4. सेंद्रिय शेती करताना माहितीची कमतरता तसेच काही शेतकऱ्यांना अजूनही योग्य मार्गदर्शन मिळत नाही.
उपाय आणि उज्वल भविष्य..
1. सरकारकडून सेंद्रिय शेतीसाठी अनुदान व प्रशिक्षण कार्यक्रम मोफत उपलब्ध आहेत.
2. शेतकरी गट तयार करून एकत्रितपणे सेंद्रिय उत्पादनांची विक्री केल्या जाऊ शकते.
3.स्थानिक बाजारपेठ, ऑनलाईन मार्केट आणि सेंद्रिय उत्पादनांची दुकाने यामधून चांगला दर हा शेतकर्याला मिळू शकतो.
4.युवकांनी शेतीत तंत्रज्ञानाचा वापर करून सेंद्रिय उत्पादनांना नवीन बाजारपेठ उपलब्ध करून द्यायला हवे.
💥सेंद्रिय शेती ही केवळ एक पर्यायी पद्धत नाही तर उज्वल भविष्याची हमी आहे. माती, पाणी, हवा आणि मानवजातीचे आरोग्य जपण्यासाठी ही शेती अत्यावश्यक आहे. शेतकऱ्यांनी थोडा संयम बाळगून सेंद्रिय पद्धती अवलंबली तर दीर्घकालीन फायदा नक्कीच होतो.
येणाऱ्या पिढ्यांसाठी सुपीक माती, निरोगी जीवन आणि सुरक्षित पर्यावरण देण्यासाठी सेंद्रिय शेती हा उज्वल मार्ग आहे.
🙏
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत website नाही किंवा कोणत्याही शासनाच्या योजनेशी संबधित नाही,कृपया याला official website म्हणून मानु नका.या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवाअधिकार्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो.धन्यवाद..