प्रधानमंत्री आवास योजना 2025 या योजेनेचा फ्रॉम घरबसल्या कसा भरायचा यादीमध्ये नाव कस लावायचं सेल्फ सर्वे कसा करायचा ?

 

 

 प्रधानमंत्री आवास योजना

 नमस्कार मित्रांनो घरकुल योजना म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना 2025 या  योजेनेचा फ्रॉम घरबसल्या कसा भरायचा यादीमध्ये नाव कस लावायचं सेल्फ सर्वे कसा करायचा  ते आपण या लेखामध्ये आपण बघणार आहोत.

                   

प्रधानमंत्री आवास योजना 2025

                   मित्रांनो सर्व प्रथम आपल्याला आपल्या आपल्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअर ओपण करायचं आहे.प्ले  स्टोअर मधून आपल्याला दोन अँप्लिकेशन डाऊनलोड करायच्या आहेत.

1]आवास प्लस २०२४ https://play.google.com/store/apps/details?id=r.rural.awaasplus_2_

02] आधार फेस RD https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd 

मित्रांनो दोन्ही अँप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला आवास प्लस २०२४ हे अँप्लिकेशन ओपन करायचं आहे.

हे अँप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपल्याला काही परमीशन AALOW करायच्या आहेत. हे अँप्लिकेशन ओपन झाल्यावर मराठी भाषा निवडायची आहे.त्या नंतर लाभार्थी वापरकर्ता या पर्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे.

ज्या लाभार्थ्याचा आपल्याला फ्रॉम भरायचा आहे.त्यांचा आधारकार्ड नंबर त्यात आपल्याला टाकायचा आहे.आधार नंबर टाकल्या नंतर एक फेस KYC आपल्याला करायची आहे.एक गोल रिंग ओपन होईल त्यात बघितल्या नंतर आपली KYC होईल.KYC झाल्यानंतर एक पिन आपल्याला तयार करायचा आहे.

म्हणजे कोणतेही चार अंक टाकून पिन तयार करायचा आहे. पिन तयार झाल्यावर पत्ता विचारेल.आपल्याला सर्व माहिती मराठी मध्ये येईल सर्व माहिती वाचून व्यवस्थित भरायची आहे.पत्ता टाकल्या नंतर स्वत:चे घर मिळवण्यासाठी सर्वेक्षण करा या पर्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे.

*सुरु करा या पर्यावर क्लिक केल्यावर पुढील काही स्टेप आपल्याला पूर्ण करायच्या आहेत.

1] वैयक्तिक तपशील - या पर्यायमध्ये आपली स्वत: जी माहिती विचारली ती आपल्याला भरायची आहे.

2]कुटुंब प्रमुख माहिती - राशन कार्ड मध्ये जो कुटुंब प्रमुख असेल त्याची माहिती वाचून व्यवस्थित भरणे.

3]कुटुंबातील सदस्य जोडा - या पर्यायामध्ये आपल्याला कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती जोडायची आहे.जसे कि नाव,आधार नंबर इत्यादी.

4]बँक खाते तपशील - अर्जदाराचा बँकचा अकाउंट नंबर इत्यादी.

5]गृहनिर्माण संबधित प्रश्न

6]जुन्या घराची प्रतिमा अपलोड करा.

7]लाभार्थी प्राधान्य क्रम निवडा.

8]सर्वेक्षन तपशिलाचे पुनरावकोलन- म्हणजे सर्व माहिती चेक करा.माहिती चेक केल्यानंतर अपलोड करा या पर्यायवर क्लिक करा.

9]आधार आणि जॉब्स कार्ड VERIFY करा. ERROR येत असेल तर थोड्या वेळाने प्रयत्न करा.

*अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

1]आधार कार्ड घरातील सर्व सदस्यांचे

2]बँक पासबुक अर्जदार

3]घराची 8 अ अर्जदार

4]घराचा फोटो

5]जॉब कार्ड- रोजगार सेवक यांच्याकडे मिळेल.

अशा प्रकारे घरकुलाचा सेल्फ सर्वे आपण घर बसल्या करू शकतो.हि सर्व माहिती AP मध्ये असल्यामुळे वेळोवेळी बदल होऊ शकतो. 

धन्यवाद.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत website नाही किंवा कोणत्याही शासनाच्या योजनेशी संबधित नाही,कृपया याला official website म्हणून मानु नका.या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवाअधिकार्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो.धन्यवाद..

पंतप्रधान रोजगार निर्मिती (PMEGP)

  पंतप्रधान रोजगार निर्मिती (PMEGP) योजनेंतर्गंत कर्जाचा अर्ज कसा कराल , कोणती कागदपत्रे आवश्यक ? वाचा सविस्तर नमस्कार मित्रांनो आपण या ले...