पंतप्रधान रोजगार निर्मिती (PMEGP)

  पंतप्रधान रोजगार निर्मिती (PMEGP) योजनेंतर्गंत कर्जाचा अर्ज कसा कराल , कोणती कागदपत्रे आवश्यक ? वाचा सविस्तर नमस्कार मित्रांनो आपण या लेखामध्ये प्रधानमंत्री रोजगार निर्मिती म्हणजेच (PMEGP)साठी कोण अर्ज करू शकतो हे बघणार आहोत. मित्र हो शासनाच्या कोणत्याही योजनेमध्ये मध्ये वेळोवेळी बदल होत असतात. त्यामुळे आपण संबधित कार्यालयाच्या अधिकार्यांसोबत व OFFICIAL संकेत स्थळासोबत CONNECT राहणे महत्वाचे असते.सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसाय उभा करण्यासाठी शासन अशा योजनांद्वारे मदत करत असते. ज्यांना खरच व्यवसाय करायचा आहे. त्या लोकांनीच या योजनेमध्ये सहभाग घ्यावा.काही लोक फक्त SUBSIDY साठी योजनेत सहभाग घेतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी CIBIL SCORE चांगला असणे आवश्यक आहे. आपण संबधित बँकेला आपला स्पॉट जागा योग्य लोकेशन वर असणे पण गरजेचे आहे. केंद्र शासनाच्या सुक्ष्म , लघु व मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ( Prime Minister Employment Generation Program) ही नवीन योजना लागू केली असून , या योजनेची अंमलबजावणी खादी ग्रामोद्योग आयोग , खादी ग्रामोद्योग बोर्ड यांचे...

"राशन कार्ड KYC कशी करावी? स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन" "KYC केल्यावर मिळणारे फायदे – जाणून घ्या संपूर्ण माहिती"

"राशन कार्ड KYC कशी करावी? स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन"  "KYC केल्यावर मिळणारे फायदे – जाणून घ्या संपूर्ण माहिती"

 

                                   "राशन कार्ड KYC कशी करावी? स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन"

मित्रांनो भारत सरकारने गरीब व गरजू कुटुंबांसाठी राशन कार्डाच्या माध्यमातून अन्नधान्य पुरवठा योजना लागू केली आहे. परंतु अलीकडील काळात अनेक बनावट लाभार्थी समोर आल्याने सरकारने KYC (Know Your Customer) प्रक्रिया अनिवार्य केली आहे. महाराष्ट्रात पोर्टलद्वारे राशन कार्ड संबंधित कामे डिजिटल पद्धतीने करण्यात येत आहेत. चला तर पाहूया, राशन कार्ड KYC म्हणजे काय, त्याचे फायदे काय आहेत, आणि ही प्रक्रिया कशी पूर्ण करायची.

 राशन कार्ड KYC प्रक्रिया (ऑनलाइन व ऑफलाइन)
 

*ऑनलाइन KYC प्रक्रिया:

तुम्ही मोबाईल मधून राशन कार्ड ची KYC करू शकता.खालील स्टेप वापरून.

१.तुमच्या मोबाईल मध्ये FACE RD हे ऍप प्ले स्टोअर मधून घ्या.

FACE RD हे ऍप  मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून ठेवा फक्त त्यामध्ये काही अनुमती ऍप ने मागितल्या तर द्या बाकी कोणतेही काम त्यात आपल्याला करायचे नाही.

२.दुसरी ऍप आपल्याला MERA KYC हि घ्यायची आहे.

३.MERA KYC ऍप घेतल्यानंतर या ऍप ला काही अनुमती देऊन ओपन  करा.आधार नंबर टाका आधार कार्ड ला जो नंबर लिंक असेल त्यावर OTP येईल तो टाका.आणि एक ROUND SHAPE दिसेल त्यात बघा. E KYC RAGISTERD SUCCESFULLY असा मेसेज आपल्याला दिसेल.

*ऑफलाइन KYC प्रक्रिया:


1. नजीकच्या रेशन दुकानात जा किंवा तहसील कार्यालयात भेट द्या.


2. KYC फॉर्म मागवा व तो व्यवस्थित भरा.


3. आवश्यक कागदपत्रांची प्रत द्या – आधार कार्ड, राशन कार्ड, पत्ता पुरावा इ.


4. बायोमेट्रिक पडताळणी करा (फिंगरप्रिंट/आधार OTP).


5. फॉर्म सबमिट करा आणि रिसीट घ्या.

*राशन कार्ड KYC चे फायदे

1. योग्य लाभार्थी धारकांची निवड: KYC मुळे खरी पात्र कुटुंबेच सरकारच्या योजनेचा लाभ घेऊ शकतात.


2. बनावट राशन कार्डांची समाप्ती होते: KYC केल्यामुळे डुप्लिकेट किंवा बनावट राशन कार्ड रद्द होतात.


3. सरल व पारदर्शक प्रक्रिया वाढते: एकदा KYC झाल्यानंतर तुमचे कार्ड अधिकृत डेटाबेसमध्ये नोंदवले जाते, ज्यामुळे भविष्यात कोणतीही अडचण येत नाही.


4. डिजिटल रेकॉर्डिंग: KYC मुळे तुमची माहिती डिजिटल स्वरूपात सेव्ह होते, जी भविष्यात कोणत्याही सेवेसाठी उपयोगी ठरते.


5. सरकारी योजनांचा लाभ: अनेक नवीन योजना (जसे PM Gareeb Kalyan Yojana) फक्त KYC पूर्ण असलेल्या कार्डधारकांनाच लागू होतात.


*महत्त्वाची टीप:


KYC न केल्यास तुमचे राशन कार्ड तात्पुरते रद्द होऊ शकते.

सरकारने ठराविक मुदतीत KYC पूर्ण करणे बंधनकारक केले आहे.

आधार कार्ड व मोबाईल नंबर अपडेट असणे आवश्यक आहे.

राशन कार्ड KYC ही एक अत्यंत आवश्यक व उपयुक्त प्रक्रिया आहे. यामुळे गरजूंना सरकारी अन्नधान्य व लाभ अधिक प्रभावीपणे दिले जाऊ शकतात. जर तुम्ही अद्याप KYC केली नसेल, तर लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करा आणि सरकारी योजनांचा फायदा घ्या.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत नाविन्यपूर्ण योजना आणि जिल्हास्तरीय योजना याअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

प्रधानमंत्री खरीप फसल विमा योजना 2025 बदल,दर,कागदपत्रे वाचा सविस्तर.

पिक विमा खरीप 2025 पिक विमा भरण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य.