
फूड लायसन्स म्हणजेच नेमकं काय?
फूड लायसन्स म्हणजेच नेमकं काय?

फूड लायसन्स म्हणजेच नेमकं काय?
नमस्कार मित्रांनो आपण आज या लेखामध्ये फूड लायसन्स म्हणजेच नेमकं काय?
या FOOD LICENCE / FSSAI बद्दल माहिती बघणार आहोत. FSSAI – FOOD SAFTY AND STANDERDES AUTHORITY OF INDIA म्हणजे एक भारतीय संस्था आहे.
भारतीय अन्न सुरक्षिता साठी बनवलेली हि एक संस्था आहे. भारत सरकारची अन्नभेसळ रोखणारी ही संस्था आहे. अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ हे भारतात अन्न सुरक्षा आणि नियमन संबंधित मजबुती नियम आहेत. ज्या अंतर्गत FSSAI हि संस्था स्थापन करण्यात आली आहे. FSSAI LICENCE किंवा FSSAI नोंदणी करणे हे कोणत्याही अन्न पदार्थ म्हणजेच खाद्य पदार्थांशी निगडित व्यवसाय सुरु करण्यापूर्वी आवश्यक परवाणा आहे.
*FSSAI LICENCE परवाना खालील व्यवसायांसाठी आवश्यक आहें.
1) बेकरी उद्योग
2) केळीचे चिप्स निर्मिती उद्योग
3) बिस्किट निर्मिती उद्योग
4) पोहा निर्मिती उद्योग
5) काजू प्रक्रिया उद्योग
6) ब्रेड/टोस्ट निर्मिती उद्योग
7) केक निर्मिती उद्योग
8) चॉकलेट निर्मिती उद्योग
9) कोकोनट मिल्क पावडर निर्मिती उद्योग
10) कस्टर्ड पावडर निर्मिती उद्योग
11) दलीया निर्मिती उद्योग
12) डाळमिल
13) एनर्जी ड्रिंक निर्मिती उद्योग
14) पिठाची गिरणी
15) फ्रेंच फ्राय निर्मिती उद्योग
16) फ्रुट ज्युस निर्मिती उद्योग
17) अद्रक - लसुण पेस्ट निर्मिती उद्योग
18) ग्रेप वाईन निर्मिती उद्योग
19) शेंगदाणा/सोयाबीन/सूर्यफूल/करडी तेल निर्मिती उद्योग (तेलघाना लाकडी/यांत्रिक)
20) हिंग निर्मिती उद्योग
21) मध निर्मिती उद्योग
22) बर्फाचे तुकडे निर्मिती उद्योग
23) आइस क्रिम कोन निर्मिती उद्योग
24) आयोडिनयुक्त मिठ निर्मिती उद्योग
25) जैम व जेली निर्मिती उद्योग
26) लिंबू शरबत निर्मिती उद्योग
27) नुडल्स/शेवई निर्मिती उद्योग
28) सीलबंद पाणि उद्योग
29) पाम तेल निर्मिती उद्योग
30) पनीर/चिज निर्मिती उद्योग
31) पापड निर्मिती उद्योग
32) पास्ता निर्मिती उद्योग
33) लोणचे निर्मिती उद्योग
34) आलू चिप्स निर्मिती उद्योग
35) राईस ब्रान तेल निर्मिती उद्योग
36) सुगंधित सुपारी निर्मिती उद्योग
37) सोया चन्क निर्मिती उद्योग
38) सोया सॉस निर्मिती उद्योग
39) हळद / मसाले निर्मिती उद्योग
40) शुगर कँडी निर्मिती उद्योग
41) सोयाबीन पनीर व सोयाबीन खरमुरे निर्मिती उद्योग
42) इम्लीपल्प निर्मिती उद्योग
43) टोमैटो प्रोसेसिंग उद्योग
44) चेरी(टूटी फृटी)निर्मिती उद्योग
45) विनेगर निर्मिती उद्योग
खाद्य पदार्थ संदर्भात जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायांना FSSAI licence परवाना आवश्यक आहे.
*FSSAI परवान्याचे काय
आहेत फायदे.
१.ग्राहकांमध्ये खाद्यपदार्थ विषयी जागरूकता निर्माण होते.
२.सरकारी योजेनेचा लाभ आपल्याला या परवान्याद्वारे घेता येतो.जसे कि शासनाची PMFME योजना असेल किंवा CMEGP योजना असेल.
3. FSSAI परवाना असल्यास आपण
आपल्या व्यवसायात विस्तार करू शकतो आणि मोठ्या प्रमाणात संधीचा लाभ आपण घेऊ शकतो.
*FSSAI / FOOD LICENCE परवान्याचे दोन प्रकार आहेत.
FSSAI STATE LICENCE (स्टेट लायसन्स):
१. ज्या व्यासायिकाची वार्षिक उलाढाल ही १२ लाखांपेक्षा जास्त आहे किंवा २० कोटींपर्यंत आहे त्यांना FSSAI STATE LICENCE आवश्यक आहे.
२. ज्या व्यासायिकाचे उत्पन्न हे दररोज दोन टन क्षमतेपर्यंत जास्त आहे, जसे कि दुग्ध व्यवसाय असेल दररोज ५० हजार लिटर आहे. त्यांना देखील FSSAI STATE LICENCE आवश्यक आहे.
FSSAI CENTRAL LICENCE (सेंट्रल लायसन्स)
१. ज्या व्यासायिकाची वार्षिक उलाढाल २० कोटींपेक्षा जास्त आहे त्याला FSSAI CENTRAL LICENCE असणे आवश्यक आहे.
*FSSAI परवान्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
१.पासपोर्ट फोटो
२.आधार कार्ड
३.बँक पासबुक
४.8 अ शहरी भाग असेल तर असेसमेंट दोन्ही नसल्यास भाडेपट्टा.
५.इलेक्ट्रिक बिल.
६.राशन कार्ड.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत website नाही किंवा कोणत्याही शासनाच्या योजनेशी संबधित नाही,कृपया याला official website म्हणून मानु नका.या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवाअधिकार्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो.धन्यवाद..