प्रधानमंत्री आयुष्मान भारत जन आरोग्य योजना (PMJAY) –बद्दल संपूर्ण माहिती.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
प्रधानमंत्री आयुष्मान भारत जन आरोग्य योजना (PMJAY) –बद्दल संपूर्ण माहिती.
मित्र हो आरोग्य ही प्रत्येक माणसाची प्राथमिक मुलभूत गरज आहे. एखाद्या वेळेस आजारपण आलं की त्यावर होणारा खर्च हा मोठा प्रश्न ठरतो. अनेक गरीब कुटुंबांना महागड्या उपचारांमुळे आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. हा खर्चाचा भार कमी करण्यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री आयुष्मान भारत जन आरोग्य योजना (PMJAY) सुरू केली आहे. ही योजना आज जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना मानली जाते.
आयुष्मान कार्ड म्हणजे काय?
भारत सरकारच्या या योजनेत पात्र कुटुंबांना दरवर्षी ₹5 लाखांपर्यंत मोफत आरोग्य विमा दिला जातो. म्हणजे आयुष्यमान कार्ड धारकाला आजारपणासाठी सरकारी तसेच निवडक खाजगी रुग्णालयांमध्ये कॅशलेस (Cashless) उपचार या योजनेंतर्गत मिळतात. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचे काही खर्च आणि रुग्णालयातून सुटल्यानंतरचे खर्च देखील यात समाविष्ट आहेत.
या योजनेचे मुख्य फायदे
1. ₹5 लाखांपर्यंत मोफत आरोग्य विमा – प्रत्येक पात्र कुटुंबाला वार्षिक विमा संरक्षण या योजनेंतर्गत दिले जाते.
2. 1500 पेक्षा जास्त आजारांचा समावेश – मोठ्या आजारांवर मोफत उपचार या योजनेंतर्गत मिळतात.
3. कॅशलेस उपचार सुविधा – कार्ड दाखवल्यावर थेट उपचार, पैसे द्यावे लागत नाहीत.
4. सरकारी व खाजगी रुग्णालयांमध्ये सुविधा – मोठ्या शहरांसोबत ग्रामीण भागातही सेवा उपलब्ध.
5. ऑपरेशन आणि गंभीर आजारांवर उपचार – हृदयविकार, कॅन्सर, मूत्रपिंड डायलिसिस, अपघाती शस्त्रक्रिया इत्यादी.या आजारांचा या योजनेत समावेश आहे.
आयुष्यमान कार्ड योजने अंतर्गत पात्र कोण आहे ?
1.आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे (BPL)
2.SECC 2011 यादीतील कुटुंबे
3.ग्रामीण व शहरी गरीब रेशन कार्ड व आधार कार्ड असलेले कुटुंब
4.आयुष्मान कार्ड योजनेंतर्गत पात्रता तपासण्यासाठी नागरिकांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे.
*आवश्यक कागदपत्रे
1.आधार कार्ड
2.रेशन कार्ड
3.रहिवासी दाखला
4.मोबाईल नंबर
5.पासपोर्ट साईझ फोटो
या योजनेंतर्गत अर्ज कसा करायचा ?
1. https://pmjay.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
2. " Eligible?" या पर्यायावर क्लिक करून आपल्या कुटुंबाची माहिती भरा.
3. लाभार्थी पात्र असल्यास जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये जाऊन नोंदणी करू शकतो.
4. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आयुष्मान गोल्डन कार्ड मिळेल.
5. हे कार्ड दाखवून तुम्ही योजनेच्या पॅनेलवरील रुग्णालयात मोफत उपचार घेऊ शकतात..
आयुष्मान कार्ड योजनेच्या रुग्णालयांची यादी कुठे मिळते?
PMJAY योजनेच्या वेबसाइटवर प्रत्येक राज्यातील मान्यताप्राप्त रुग्णालयांची यादी आपल्याला उपलब्ध आहे. याशिवाय हेल्पलाईन क्रमांक 14555 वर कॉल करून देखील माहिती मिळवता येते.
*महाराष्ट्रात आयुष्मान कार्ड या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणावर घेतला जातो. तसेच जिल्हा रुग्णालयांपासून खासगी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलपर्यंत उपचाराची सुविधा यामध्ये मिळते. तसेच ग्रामीण भागातील लोकांसाठी ही योजना खूप मोठा आधार ठरली आहे.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही गरीब व दुर्बल कुटुंबांसाठी वरदान आहे. महागड्या उपचारांसाठी पैसे जमवण्याची चिंता न करता लोकांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा मिळते. प्रत्येक पात्र कुटुंबाने या योजनेचा लाभ घ्यावा आणि आयुष्मान कार्ड करून घ्यावे, हा संदेश सर्वत्र पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत website नाही किंवा कोणत्याही शासनाच्या योजनेशी संबधित नाही,कृपया याला official website म्हणून मानु नका.या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवाअधिकार्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो.धन्यवाद..