पीएम विश्वकर्मा योजना काय आहे? किती कर्ज मिळेल आणि अर्ज कसा करावा, पात्रता, लाभ.

  पीएम विश्वकर्मा योजना काय आहे? किती कर्ज   मिळेल आणि अर्ज कसा करावा, पात्रता, लाभ  सविस्तर माहितीसाठी खाली वाचा.

PM Vishwakarma Scheme 2023, चे लाभ कोणाला मिळतील, ऑनलाइन अर्ज कसा करावा. -  Marathi Utsav

पीएम विश्वकर्मा योजना

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

नमस्कार मित्रांनो 

आपण या लेखामध्ये PM विश्वकर्मा या योजनेबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. मित्र हो   सर्वसामान्या नागरिकांना पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहेत. या योजनांच्या माध्यमातून गरिब नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारावी सरकारचा उद्देश आहे. यापैकी एक योजना म्हणजे पंतप्रधान विश्वकर्मा योजना . प्रत्येक गरजू आणि गरीब वर्गाला लाभ मिळवून देण्यासाठी सरकारने ही योजना सुरु केलीय. दरम्यान, या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत काय आहे, यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

  • विश्वकर्मा योजेनेअंतर्गत १४० जातींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.या योजनेद्वारे आपल्या परिसरातील गरीब कुटुंबाना मदत केली जाते. जुने परंपरागत व्यवसाय तसेच जुनी संस्कृती जिवंत ठेवण्याचा प्रयत्न या योजनेद्वारा केला जातो. यासाठी लाभार्थी कामगारांना PM विश्वकर्मा पोर्टल वर नोंदणी करणे गरजेचे असते,करावी लागते. नोंदणी झाल्यानंतर नोंदणीकृत  कामगारांना संबधित क्षेत्रात प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कामगारांना अवजारे  खरेदी करण्यासाठी १५००० रुपये दिले जातात.

 

  • PM विश्वकर्मा योजनेंतर्गत किती कर्ज मिळते..?

जर लाभार्थी व्यक्तीकडे पारंपारिक कौशल्य असेल तर पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जाची सुविधा या योजनेंतर्गत उपलब्ध असेल. या योजनेअंतर्गत 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. पहिल्या टप्प्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. यानंतर व्यवसाय विस्तारासाठी दुसऱ्या टप्प्यात 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे. हे कर्ज फक्त 5 टक्के व्याजदराने लाभार्थ्याला मिळत असते.

 

  • PM विश्वकर्मा योजनेंतर्गत कौशल्य प्रशिक्षण

या योजनेत लाभार्थ्यांसाठी 18 पारंपरिक कामांचा समावेश करण्यात आला आहे. या 18 ट्रेडमध्ये लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी मास्टर ट्रेनर्सच्या माध्यमातून प्रशिक्षणही दिले जाणार आहे. तसेच दररोज 500 रुपये स्टायपेंड देखील मिळेल. याशिवाय पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र, ओळखपत्र, मूलभूत आणि प्रगत प्रशिक्षणाशी संबंधित कौशल्य अपग्रेड, 15,000 रुपयांचे टूलकिट प्रोत्साहन पर डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन देखील दिले जाते.

  • PM विश्वकर्मा योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांची पात्रता काय असावी..?

1. भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
2. योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या 18 व्यवसायांपैकी कोणत्याही एकाशी संबंधित असणे आवश्यक आहे.
3. वय 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 50 वर्षांपेक्षा कमी असावे.
4. मान्यताप्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र लाभार्थ्याकडे असावे.
5. योजनेत समाविष्ट केलेल्या 140 जातींपैकी कोणत्याही एका जातीचा असावा.

 

  • या योजनेत सहभाग घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे..?

1.आधार कार्ड

2.पॅनकार्ड

3.उत्त्पन्न दाखला

4.जातीचा दाखला

5.रहीवाशी प्रमाणपत्र

6.पासपोर्ट फोटो

7.बँक पासबुक

8.मोबाईल नंबर असणे आवश्यक.

 

  • PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी व्यक्ती संबंधित 18 क्षेत्रांमधील असणे आवश्यक आहे. 

सुतार
बोट किंवा नाव बनवणारे
लोहार
टाळे बनवणारे कारागीर
सोनार
कुंभार
शिल्पकार
मिस्त्री
मच्छिमार
टूल किट निर्माते
दगड फोडणारे मजूर
मोची कारागीर
टोपली, चटई, झाडू बनवणारे
बाहुली आणि इतर पारंपारिक खेळणी उत्पादक
न्हावी
हार बनवणारे
धोबी
शिंपी

  • योजनेसाठी अर्ज कसा करायचा..?

1. सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट pmvishwakarma.gov.in वर जा.
2. येथे Apply Online लिंकवर क्लिक करा.
3. पीएम विश्वकर्मा योजनेत नोंदणी करा.
4. नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे येईल.
5. यानंतर, नोंदणी फॉर्म पूर्णपणे वाचा आणि तो पूर्णपणे भरा.
6. भरलेल्या फॉर्मसह सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा. यानंतर सबमिट बटण दाबा.

जवळच्या CSC सेंटर वर जाऊन हि आपण योजनेचा फ्रॉम भरू शकतो.

 

लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद....

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत website नाही किंवा कोणत्याही शासनाच्या योजनेशी संबधित नाही,कृपया याला official website म्हणून मानु नका.या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवाअधिकार्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो.धन्यवाद..

पंतप्रधान रोजगार निर्मिती (PMEGP)

  पंतप्रधान रोजगार निर्मिती (PMEGP) योजनेंतर्गंत कर्जाचा अर्ज कसा कराल , कोणती कागदपत्रे आवश्यक ? वाचा सविस्तर नमस्कार मित्रांनो आपण या ले...