![]() |
UDYAM RAGISTRATION |
उद्योग आधार/उद्यम नोंदणी म्हणजे काय आहे? कशी करायची..?
नमस्कार मित्रांनो आपण या लेखामध्ये उद्योग आधार ज्याला आपण उद्यम नोंदणी सुद्धा म्हणतो नेमक उद्योग आधार म्हणजे काय याबद्दल सविस्तर माहिती आपण लेखामध्ये बघणार आहोत. मित्र हो प्रत्येक व्यावसायिकाच्या मनात एक प्रश्न येतो की उद्योग आधार नोंदणी म्हणजे काय? तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आवश्यक परवाना काढणे आवश्यक असते. लघु, सूक्ष्म आणि मध्यमवर्गीय व्यावसायिकाच्या गरजा लक्षात घेऊन सुरू केलेली ही योजना आहे.
मित्र हो आपण बघतो आजकाल सर्व कामे हि ऑनलाइन होत आहेत. पूर्वी नोंदणी प्रक्रिया खूप किचकट असायची आणि व्यावसायिकाला खूप धावपळ करावी लागत असे. त्यामुळे त्यांचे पैसेही खर्ची पडत होते तसेच त्यांचा वेळही वाया जात होता, मात्र सध्या व्यावसायिकाला हवे असल्यास ते लघु उद्योग ऑनलाइन उद्योग आधार नोंदणी अंतर्गत त्यांचा उद्योग नोंदणी करू शकतात तेही अगदी मोफत. या नोंदणीमध्ये उद्योजकाला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागत नाही.हि संपूर्ण प्रक्रिया हि मोफत निशुल्क असते.
तर मित्रांनो, तुम्हाला कोणताही लघु किंवा मध्यम व्यवसाय सुरू करायचा असेल आणि तुम्हाला उद्योग आधार नोंदणी मोफत करायची असेल तर आजच्या लेखात पाहणार आहोत की तुम्ही घरबसल्या ऑनलाइन उद्योग आधार नोंदणी करून प्रमाणपत्र कसे मिळवू शकता.
मित्र हो व्यवसाय सुरू करण्यासाठी पूर्वी (Entrepreneurs Memorandum 1) आणि (Entrepreneurs Memorandum 2) असे दोन प्रकारचे फॉर्म भरले जायचे.
या दोन्ही पद्धतींचा फॉर्म भरत असताना इतरही अनेक प्रकारचे फॉर्म
भरले जायचे,
त्यामुळे लोकांना खूप त्रास व्हायचा म्हणून सरकारने MSME
(Micro, Small & Medium Enterprises मंत्रालय) च्या मदतीने
लोकांसाठी मोफत उद्योग आधार नोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज मागून ते खूप सोपे केले आहे.
याच्या मदतीने, तुम्ही तुमचा उद्योग लहान
स्तरावर सुरू करत असाल किंवा मध्यम स्तरावर सुरू करत असाल व तुम्ही सूक्ष्म
स्तरावर सुरू करत असाल, तर यामध्ये तुम्ही अगदी कमी वेळेत ऑनलाइन नोंदणी करून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त
करू शकता.
UDYOG AADHAR MEMORANDUM म्हणजे काय..?
मित्र हो UDYOG AADHAR MEMORANDUM म्हणजे काय? आपण बघतो लोक हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात याचे पूर्ण स्वरूप म्हणजे उद्योग आधार मेमोरेंडम हा एक नोंदणी फॉर्म आहे ज्यामध्ये व्यावसायिकाला त्याच्या स्वतःच्या व्यवसाया संबंधित सामान्य माहिती जसे की आधार कार्ड, बँक खाते माहिती इ. नोंदणी करण्यासाठी द्यावी लागते.
उद्योग आधार नोंदणीसाठी लागणारे कागदपत्रे व आवश्यक माहिती
1) व्यावसायिकाचे आधार कार्ड
2) पॅनकार्ड
3) बँक पासबुक
4) आधार ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक असते.
5) व्यावसायिक जो व्यवसाय करत असेल त्या व्यवसायाचे नाव.
6) व्यावसायिकाचा पत्ता व्यवसायाचा पत्ता.
7) व्यवसाय सुरु केल्याची तारीख.
8) व्यवसायाचे बँक खाते क्रमांक व ifsc code नसेल तर व्यावसायिकाचा.
9) तुमच्या व्यवसायात / कंपनीत काम करणाऱ्या मजुरांची/कामगारांची संख्या.
उद्योग आधार प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?
1) सर्व प्रथम GOOGLE CHROME वर उद्योग आधार किंवा उद्यम रजिस्ट्रेशन असे SEARCH करा. जी पहिली SITE येईल त्यावर क्लीक करा.
2) त्यामध्ये ENTER केल्यानंतर FOR NEW ENTERPRENURES WHO NOT RAGISTRED MSME या पर्याय वर क्लिक करा.
3) ओपण झाल्यानंतर आधार नंबर टाका.
4) आधार ला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक OTP आला असेल तो OTP टाका.
5) पॅनकार्ड नंबर टाका.
6) त्यानंतर एक फ्रॉम ओपन होईल तो फ्रॉम काळजीपूर्वक भरा त्यामध्ये तुमच्या व्यवसायाची माहिती, पत्ता,जात,बँक माहिती,कामगार संख्या इत्यादी सोपी माहिती असते.
7) सर्व फ्रॉम भरल्यानंतर एक OTP आधार लिंक मोबाईल वर येईल. कॅप्टचा टाकून सबमिट करा.
8) UDYAM NUMBER GENRATE होईल तो COPY करून घ्या त्याच SITE वर PRINT/VERIFY OPTION वरून प्रमाणपत्र प्रिंट करून घ्या.
उद्योग आधार नोंदणीचे फायदे
1) तुम्हाला किंवा कोणत्याही व्यावसायिकाला व्यवसाय सुरू करण्यासाठी इतर कोणत्याही शासकीय कार्यालयात जाण्याची गरज नाही.
2) कोणताही व्यावसायिक कोणत्याही व्यवसायाची ऑनलाइन नोंदणी करू शकतो, ज्यामुळे तुमचा वेळ आणि पैसेही वाचतील.
3) व्यवसायाची ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर लगेच व्यावसायिकाला व्यवसायाचा नोंदणी क्रमांक मिळतो.
4) उद्योग आधार नोंदणी केल्यानंतर व्यावसायिक सर्व सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र होतो.
5) उद्योग आधार नोंदणी केल्यानंतर तुम्ही लगेच बँक मध्ये अजून व्यवसायावर कर्ज घेऊ शकता.
ज्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रमाणपत्र काढणे शक्य नसल्यास त्यांनी जवळच्या CSC CENTER वर जाऊन काढू शकता.
तुम्हाला हा लेख आवडल्यास आपल्या व्यावसायिक मित्रांना नक्कीच SHARE करा. हा लेख शेवट पर्यंत वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद...
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत website नाही किंवा कोणत्याही शासनाच्या योजनेशी संबधित नाही,कृपया याला official website म्हणून मानु नका.या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवाअधिकार्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो.धन्यवाद..