![]() |
PMFME |
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना(PMFME)
- ऑनलाइन अर्ज, पात्रता, लाभसविस्तर माहितीसाठी खाली वाचा.
नमस्कार मित्रांनो आपण या लेखामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना(PMFME) या योजनेबद्दल माहिती बघणार आहोत. अन्नावर प्रक्रिया करणाऱ्या व्यावसायिकांसाठी खुश खबर आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने मार्फत (PMFME) अन्नावर प्रक्रिया करणाऱ्या व्यावसायिकांना या योजनेमार्फत 35% SUBSIDY मिळणार आहे. काय पात्रता..? अर्ज कसा करायचं..? काय लाभ व्यावसायिकांना मिळणार आहेत..? याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये बघणार आहोत तर लेख शेवट पर्यंत वाचा.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना(PMFME)
कृषी विभागाची अन्न प्रक्रियेशी संबंधित असलेल्या, सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना सामायिक पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी तसेच अर्थसहाय्य करण्यासाठी सुरु करण्यात आलेली महत्वाची अशी एक योजना आहे.
प्रधानमंत्री
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी राज्य सरकार 35 टक्के अनुदान म्हणजे जास्तीत
जास्त 10 लाख ते 3 कोटी रुपयाचे अर्थसहाय्य
उपलब्ध करून देत आहे यामध्ये केंद्र शासनाचा हिस्सा 60 टक्के व राज्य शासनाचा हिंसा 40 टक्के असेल.
शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाला रास्त भाव मिळून
देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील तरुणांना, बेरोजगारांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रधानमंत्री
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सुरू करण्यात आली आहे.
कृषि उत्पादनांवर प्रक्रिया करणे तसेच वाया जाणाऱ्या कच्च्या शेतमालाचे प्रमाण कमी करणे, उत्पादनाची योग्य पारख करणे, उत्पादनाची साठवणूक, प्रक्रिया, पॅकेजिंग, मार्केटिंग व ब्रेडींग यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे.
PMFME योजनेची ची उद्दिष्ट्ये
- PMFME सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना, या उद्योगांमधील वैयक्तिक लाभार्थी, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO), बचत गट , सहकारी संस्था यांना कर्ज पुरवठा करणे.
- उद्योगांमध्ये पुरवठा साखळी मजबूत करणे.
- असंघटित अन्न प्रक्रिया उद्योग नोंदणीकृत करणे.
- सार्वजनिक किंवा सामाईक अन्न प्रक्रिया सुविधा निर्माण करणे.
- साठवण क्षमता वाढवणे, गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा उभारणे, पॅकेजिंग सुविधा उभारणे.
- अन्न प्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे सक्षमीकरण.
PMFME योजनेसाठी साठी पात्रता
- वैयक्तिक लाभार्थी
- सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजक
- शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO)
- बचत गट (Self Help Groups)
- सहकारी संस्था
- नवीन अन्न प्रक्रिया सुरु करू इच्छिणारे लाभार्थी.
- प्रोप्रायटरशिप आणि पार्टनरशिप फर्म
- लाभार्थीचे कमीत कमी वय १८वर्ष असावे
- सुरवातीला लाभार्थी किमान आठवी पास असावा असा नियम होता परंतु आता शिक्षणाची कोणतीही अट नाही परंतु लाभार्थ्याला अन्न प्रक्रिया उद्योगाचा अनुभव असावा.
- एका कुटुंबातील एक व्यक्ती पात्र
अर्ज कोण करू शकतात..?
- नवीन सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग
- चालू असणारे सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग
- प्रकल्पात १० पेक्षा कमी कामगार असणारे उद्योग
- प्रकल्पाची मालकी वैयक्तिक, प्रोप्रायटरशिप आणि पार्टनरशिप फर्म कमी असणारे उद्योग.
- सुरवातीला LLP व Pvt Ltd कंपन्या या योजनेत पात्र नव्हत्या परंतु २०२२ पासून यासुद्धा पात्र आहेत.
- बिगर सरकारी संस्था (NGO)
PMFME योजना अंतर्गत मोफत प्रशिक्षण
· PMFME या योजनेअंतर्गत कर्ज मंजूर लाभार्थ्यांना 50 तासांचे प्रशिक्षण तर अन्न व प्रक्रिया उद्योगातील कामगारांना 24 तासांचे प्रशिक्षण जिल्हास्तरीय प्रशिक्षण संस्थेत देण्यात येते.
PMFME योजना अंतर्गत मिळणारी कर्ज रक्कम
PMFME या योजनेअंतर्गत ९०% पर्यंत कर्ज मिळते. PMFME scheme subsidy अंतर्गत मिळणारे अनुदान प्रकल्प खर्चाच्या ३५% पर्यंत किंवा जास्तीत जास्त १० लाख रुपयांपर्यंत मिळते म्हणजेच आपण जर ३० लाख रुपयांपर्यंतचा प्रकल्प उभारणार असाल तर आपल्याला ३५% व जास्तीत जास्त १० लाख अनुदान मिळू शकते.
PMFME योजना अंतर्गत स्वगुंतवणूक किती करावी लागते...?
PMFME scheme अंतर्गत कर्जासाठी आपल्याला कमीत कमी १०% स्वगुंतवणुक करणे बंधनकारक आहे.
PMFME योजना अंतर्गत व्याजदर किती असतो..?
प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योगासाठी बँकेमध्ये सरासरी ११% ते ११.५०% व्याजदर आहे. आपण जर आपल्या बँकेला विनंती केली कि आपले कर्ज “कृषी पायाभूत सुविधा उभारणी योजना (PMFME scheme with Agriculture Infrastructure Fund)” या योजनेला लिंक केले आणि आपले कर्ज या योजनेअंतर्गत पात्र झाले तर या योजनेअंतर्गत ९% व्याजदर लागू होतो. त्याउपर ३% व्याज परतावा मिळतो म्हणजेच आपल्याला हे कर्ज ६% व्याजदराने पडेल.
PMFME योजना Subsidy
PMFME या योजनेअंतर्गत प्रकल्प खर्चाच्या ३५% पर्यंत अनुदान मिळते. अनुदानासाठी अर्ज करण्याची सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे. PMFME Scheme Subsidy हि (Credit Linked Subsidy)आहे म्हणजेच आपली सबसिडी आपल्या कर्ज असलेल्या बँकेला पाठवली जाते व ती सबसिडी आपल्या कर्जाला लिंक केली जाते व ३ वर्षानंतरच आपल्या कर्ज खात्याला जमा होते.
PMFME योजनेसाठी कर्जाला तारण...?
10 लाखापर्यंत कोणत्याही गहन खताची गरज नसते. जर आपले कर्ज 10 लाखाच्या वर असेल तर बँक PROPERTY गहाण घेऊ शकते.
PMFME योजनेचा परतफेड कालावधी...?
PMFME योजने अंतर्गत जास्तीत जास्त 7 वर्ष परतफेड कालावधी मिळतो. व कमीत कमी 3 वर्ष कालावधी मिळतो. परतफेड कालावधी हा प्रकल्पातून होणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असतो त्यामुळे छोट्या प्रकल्पासाठी कदाचित बँक कमी परतडफेड कालावधी सुद्धा देऊ शकते.
एक जिल्हा एक उत्पादन
PMFME या योजनेअंतर्गत एका जिल्ह्यात एखादा विशिष्ट प्रॉडक्ट असेल तर त्या संबंधित अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी चालना दिली जाते जेणेकरून त्या प्रॉडक्टच्या पुरवठा साखळीत किंवा मार्केटिंग साठी विशेष लक्ष घालून त्या उद्योगाचा विकास करता येईल. या अंतर्गत काही सामायिक मूलभूत सुविधा उभारल्या जातात उदा.पॅक हाऊस.
जिल्हा संसाधन व्यक्ती (DRP)
जिल्हा संसाधन व्यक्ती (DRP)डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन हि अशी व्यक्ती असते जी आपल्याला PMFME Scheme ची संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी मदत करत असते. हि व्यक्ती PMFME ने नेमलेली आहे आणि यासाठी आपल्याला कोणतेही शुल्क देण्याची आवश्यकता नसते. कृषी विभागामध्ये या योजनेची माहिती विचारली असता आपणाला जिल्हा संसाधन व्यक्तीची यादी व योजनेविषयी माहिती दिली जाते.
PMFME योजनेअंतर्गत येणारे उद्योग खालीलप्रमाणे.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत उद्योगाची यादी
1) बेकरी उद्योग
2) केळीचे चिप्स निर्मिती उद्योग
3) बिस्किट निर्मिती उद्योग
4) पोहा निर्मिती उद्योग
5) काजू प्रक्रिया उद्योग
6) बेकरी (ब्रेड/टोस्ट/खारी इ.) निर्मिती उद्योग
7) केक निर्मिती उद्योग
8) चॉकलेट निर्मिती उद्योग
9) कोकोनट मिल्क पावडर निर्मिती उद्योग
10) कस्टर्ड पावडर निर्मिती उद्योग
11) दलीया निर्मिती उद्योग
12) डाळमिल
13) एनर्जी ड्रिंक निर्मिती उद्योग
14) पिठाची गिरणी
15) फ्रेंच फ्राय निर्मिती उद्योग
16) फ्रुट ज्युस निर्मिती उद्योग
17) अद्रक - लसुण पेस्ट निर्मिती उद्योग
18) ग्रेप (द्राक्ष) वाईन निर्मिती उद्योग
19) शेंगदाणा/सोयाबीन/सूर्यफूल/करडी/ जवस/मोहरी/तीळ तेल इ. निर्मिती उद्योग (तेलघाना लाकडी/यांत्रिक)
20) हिंग निर्मिती उद्योग
21) मध निर्मिती उद्योग
22) डाळींब उद्योग
23) आइसक्रिम कोन निर्मिती उद्योग
24) फळांची (चिकू/केळी/पपई/आंबा) मिठाई
25) जैम व जेली निर्मिती उद्योग
26) लिंबू शरबत निर्मिती उद्योग
27) नुडल्स/शेवई निर्मिती उद्योग
28) ज्यूस/शरबत निर्मिति
29) पाम तेल निर्मिती उद्योग
30) दूग्धजन्य पदार्थ (पनीर/चिज/श्रीखंड/आम्रखंड/खोवा/ तूप इ.) निर्मिती उद्योग
31) पापड निर्मिती उद्योग
32) पास्ता निर्मिती उद्योग
33) लोणचे निर्मिती उद्योग
34) आलू चिप्स निर्मिती उद्योग
35) राईस ब्रान तेल निर्मिती उद्योग
36) सुगंधित सुपारी निर्मिती उद्योग
37) सोया चन्क निर्मिती उद्योग
38) सोया सॉस निर्मिती उद्योग
39) मिरची/हळद/मसाले निर्मिती उद्योग
40) शुगर कँडी निर्मिती उद्योग
41) सोयाबीन पनीर व सोयाबीन खरमुरे, सोयाबीन वडी, सोया स्टीक्स निर्मिती उद्योग
42) इम्लीपल्प निर्मिती उद्योग
43) टोमैटो प्रोसेसिंग उद्योग
44) चेरी(टूटी फृटी) निर्मिती उद्योग
45) विनेगर निर्मिती उद्योग
46) पशू खाद्य
47) मशरूम निर्मिती उद्योग
48) सुकडी निर्मिति उद्योग
49) नमकीन निर्मिति उद्योग
Note: वरील यादी आपल्या उद्योगाच्या अनुषंगाने दिलेली आहे असं नाही की हेच प्रोजेक्ट तुम्ही टाका किंव्हा तुमच्या परिसरात वरील प्रोजेक्ट चालत असेल तर टाकू शकता. मानवाला किंवा पशुला जे खाद्य लागेल, ते अन्न प्रक्रिया प्रोजेक्ट तुम्ही टाकू शकता वरील लिस्ट फक्त ढोबळमानाने तयार केलेली आहे.
सदर उद्योगांकरिता 35% आणि मार्केटींग व ब्रॅण्डिंग साठी 50% अनुदान उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी आपण आपापल्या परिसरातील कृषी विभाग व जिल्हा संसाधन व्यक्ती यांना भेटू शकतो.
PMFME योजनेचा अर्ज कसा करावा...?
PMFME योजनेचा अर्ज करण्यासाठी आपण जिल्हा संसाधन व्यक्ती तसेच कृषी विभागाच्या मदतीने अर्ज करू शकतो. याची संपूर्ण माहिती ऑनलाईन असते.
- PMFME योजनेसाठी लागणारी कागदपत्रे.
01. आधार कार्ड
02. पॅनकार्ड
03. रेशनकार्ड/ इलेक्ट्रिक बिल/ 8 अ तिन्ही पैकी एक
04. बँक पासबुक
05. मशीन कोटेशन
06. मार्कशिट/ शाळा सोडण्याचा दाखला (दोन्ही पैकी एक)
आपण हा लेख शेवटपर्यंत वाचला त्यासाठी खूप खूप धन्यवाद आवडला असेल तर गरजूंना नक्की SHARE करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत website नाही किंवा कोणत्याही शासनाच्या योजनेशी संबधित नाही,कृपया याला official website म्हणून मानु नका.या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवाअधिकार्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो.धन्यवाद..