मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP):
ऑनलाइन अर्ज, पात्रता, लाभ सविस्तर माहितीसाठी खाली वाचा.
*मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना (CMEGP)*
नमस्कार मित्रांनो आपण या लेखामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना (CMEGP) बद्दल माहिती बघणार आहोत. खूप तरुणांचे स्वप्न असते कि स्वत: चा व्यवसाय असला पाहिजेत. व्यवसाय करून स्वत: च्या पायावर उभे राहून त्यांना स्वावलंबी व्हायचे असते. परंतु व्यवसाय करण्यासाठी भांडवलाची(पैशाची) गरज असते. परंतु पुरेशे भांडवल(पैसे) नसल्या कारणाने व्यवसाय सुरु करण्यासाठी त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या सर्व बाबी विचारत घेऊन महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यातील तरुणांसाठी व्यवसायाच्या संधी निर्माण करण्यासाठी नवनवीन सरकारी योजना राबवून तरुणांना आर्थिक साहाय्य करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार करत असते. या योजना पैकी च एक मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना (CMEGP).
मित्र हो या लेखामध्ये आपण शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना (CMEGP) महाराष्ट्र योजने संबधित संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. जसे कि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे योजनेची उद्दिष्ट, योजनेचे फायदे इत्यादी माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे आमचा लेख शेवटपर्यंत वाचा.
*मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची वैशिष्ट्ये*
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना महाराष्ट्र राज्यातील लघु ग्रामोद्योग यांच्यामार्फत राबविण्यात येते.
- या योजनेअंतर्गत महिलांचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे व त्यांच्यासाठी या योजनेत 30 टक्के आरक्षण देण्यात आले आहे.
- या योजनेअंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण, पारंपारिक कारागीर यांच्यासाठी नाविन्यपूर्ण उद्योग, वैशिष्टपूर्ण प्रकल्प उभारून शाश्वत रोजगार प्रदान करणे, तसेच ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांनाचे शहरांकडे होणारे स्थलांतर रोखण्यास मदत करणे.
- हि योजना राज्यातील वैयक्तिक उद्योजक, सहकारी संस्था यांच्यासाठी आहे हे या कार्यक्रमाचे लाभार्थी आहेत, या योजनेमध्ये लाभार्थ्यांचे योगदान कमी ठेवण्यात आले आहे, जेणेकरून लाभार्थी या कार्यक्रमाचा लाभ घेऊन वविध नवीन उपक्रम उभे करू शकतील.
- या योजनेची महाराष्ट्र शासनच्या उद्योग विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील उदोग संचालनालयाव्दारे, जिल्हा उद्योग केंद्र (DIC), तसेच उद्योग संचालनालयाच्या नियंत्रणाखाली महाराष्ट्र खादी ग्रामउद्योग बोर्ड (KVIB) व बँकेव्दारा अंमलबजावणी आणि निरक्षण केले जाते.
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील तरुण स्वतःचा एखादा व्यवसाय सुरु करू शकतील व ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करतील त्यामुळे ग्रामीण भागातील तरुण नोकरीसाठी शहरी भागात जाण्याची गरज भासणार नाही.
*मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचे उद्दिष्ट*
- राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी नोकरी शोधण्यापेक्षा स्वतःचा लघु उद्योग सुरु करावा, व्यवसायांकडे यावे. स्वतःचे लघु उद्योग उभे करून स्वावलंबी व्हावे,या उद्देशाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची सुरुवात करण्यात आली. जेणेकरून तरुण / तरुणी स्वतःचा उद्योग सुरु करून स्वतःच्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर बनतील व राज्यातील इतर तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करतील.
- सुरवातीच्या वर्षात एकूण 10000 उद्योग स्थापण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. या योजने अंतर्गत एकूण उपक्रमांच्या 30 टक्के उपक्रम महिला वर्गासाठी आणि 20 टक्के उद्योग अनुसूचित जाती व जमाती वर्गातील अर्जदारांसाठी राखून ठेवण्यात येईल.
- राज्यातील लघु उद्योजकांना प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश्य आहे.
- राज्यातील तरुणांना स्वतःचा लघु उद्योग सुरु करण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे जेणेकरून ते स्वरोजगार सुरु करू शकतील.
- या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 8 ते 10 लाख तरुणांना रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या नव-नवीन संधी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा उद्देश आहे.
*मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंमलबजावणी करणाऱ्या संस्था*
या योजनेमध्ये 25 लाखापेक्षा जास्त खर्च असलेल्या उद्योगाची अंमलबजावणी आणि नियंत्रण करणारी एजन्सी शहरी भागात तसेच ग्रामीण भागात जिल्हा उद्योग केंद्र आहे. असे प्रस्ताव असतील तर आवश्यकतेनुसार DOI व्दारे निर्णय मंजूर केले जाते.
जिल्हास्तरावर योजनेचे सर्वांगीण देखरेख जिल्हा उद्योग केंद्र, महाव्यवस्थापक द्वारे केले जाते. तसेच प्रादेशिक सहसंचालक द्वारे त्यांच्या संबंधित प्रदेशासाठी संपूर्ण देखरेख केली जाते.
*मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत पात्रता*
- या योजनेत सहभाग घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र राज्यातील 18 ते 45 वयोगटातील व्यक्ती, विशेष श्रेणीसाठी (अनुसूचित जाती, जमाती, महिला, माजी सैनिक) यांच्यासाठी 5 वर्ष शिथिल पात्र राहतात.
- वैयक्तिक मालकी, भागीदारी, वित्तियसंस्थाने, मान्यता दिलेले बचत गट, तत्सम केंद्र अर्जदार राज्य शासनाच्या अन्य विभागांकडून अनुदानावर आधारित स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- या योजनेंतर्गत कुटुंबातील एकच व्यक्ती पात्र असेल.
- या योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य फक्त नवीन सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी उपलब्ध आहे.
*मुख्यमंत्री उद्योग योजना महाराष्ट्र अंतर्गत शैक्षणिक पात्रता*
या योजनेत सहभाग घेण्यासाठी अर्जदाराची शैक्षणिक पात्रता किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 10 लाख ते 25 लाख पर्यंतच्या उद्योगांसाठी सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच 25 लाखांपेक्षा जास्त खर्चाच्या उद्योगांसाठी 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असते.
*मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचे नियम/ अटी*
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला फक्त महाराष्ट्र राज्यात उद्योग सुरु करणे बंधनकारक असेल तसेच लाभार्थ्याला महाराष्ट्र राज्याच्या बाहेर उद्योग सुरु करता येणार नाही.
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना या योजनेअंतर्गत महिला अर्जदारांना एकूण वार्षिक लक्ष्यामध्ये मध्ये 30 टक्के आरक्षण असेल.
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना अपंग अर्जदारास समाजकल्याण विभागाच्या तरतुदीनुसार 3 टक्के आरक्षण असेल.
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजने अंतर्गत तयार किंवा बांधलेल्या शेड, गाळा यांची किंमत एकूण प्रकल्प खर्चाच्या जास्तीत जास्त 20 % असणे आवश्यक आहे.
- SC आणि ST अर्जदारानां एकूण वार्षिक लक्ष्यामध्ये 20 % आरक्षण असेल.
- अर्जदार एखाद्या बँकेत थकबाकी रक्कम असता कामा नये.
*मुख्यमंत्री रोजगार योजनेसाठी प्रशिक्षण*
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजने अंतर्गत कर्ज प्रस्ताव मंजूर झालेल्या प्रस्तावामध्ये लाभार्थ्याचे दोन आठवडे कालावधीचे निवासी उद्योजकीय प्रशिक्षण अनिवार्य असून यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या अर्जदारांनाच कर्ज वितरण अनुदान सहाय्य वितरणासाठी पात्र ठरविण्यांत येते . अर्जदाराच्या प्रशिक्षणाचा खर्च CMEGP योजनेसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या तरतुदीतून करण्यात येईल. एकूण तरतुदीच्या 5% इतकी रक्कम प्रशिक्षण कार्यक्रमासाठी राखून ठेवण्यात येत असते. सदर प्रशिक्षनाची अंमलबजावणी उद्योजकीय प्रशिक्षणात कार्यरत असणाऱ्या राज्य पुरस्कृत संस्था – महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, तसेच राज्य स्तरीय नियंत्रण समितीने मान्यता दिलेल्या, राज्यातील इतर नामवंत संस्था मार्फत आयोजित करण्यात येतात.
*CMEGP अंतर्गत अर्ज प्रक्रिया*
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना या योजनेच्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी संपूर्ण प्रक्रियेसाठी ऑनलाईन पध्दतीचा अवलंब करण्यात येतो.
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना या योजनेसाठी स्वतंत्र CMEGP पोर्टल विकसित केले आहे या पोर्टल द्वारे कर्ज मागणी प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्रास किंवा खादी व ग्रामोद्योग मंडळ (KVIB) संस्थेस सादर करण्यात येतात.
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या पात्र उमेदवारांना समुपदेशनसाठी निमंत्रित करण्यांत येवून त्यांद्वारे प्राथमिक निवड यादी जिल्हाउपसमिती मार्फत तयार केली जाते.
- प्राथमिक यादी जिल्हास्तरीय कार्यबल समितीद्वारे अंतिम करण्यात येत्ते. सदर जिल्हा कार्यबल समितीद्वारा अंतिम मंजूरी देण्यात आलेल्या कर्ज प्रस्तावांची शिफारस पुढील मंजूरीसाठी संबंधित जिल्ह्याचे उपायुक्त / जिल्हाधिकारी व जिल्हा उद्योग केंद्र यांचेकडून संबंधित प्रस्ताव बँकास सादर करण्यात येतात.
- शिफारस करण्यांत आलेल्या प्रस्तावांची बँकस्तरावर प्रकल्पाची वित्तीय व्यवहार्यता, अनुषंगिक बाबी तपासून बँक कर्ज मंजूरी बाबतचा निर्णय घेईल. प्रस्तावास कर्ज मंजूरी असल्यास मंजूरी संबंधिचा तपशिल ऑनलाईन द्वारे बँकेमार्फत उपायुक्त / जिल्हाधिकारी, जिल्हा उद्योग केंद्र यांना सादर करण्यात येते.
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अर्ज प्रक्रिया, छाननी, समुपदेशन, बँकेस कर्ज प्रस्तावची शिफारस, कर्ज मंजूरी या सर्व प्रक्रिया जिल्हा स्तरावर पूर्ण होतील. उपायुक्त / जिल्हाधिकारी, जिल्हा उद्योग केंद्र हे बँकानी मंजूर केलेला तपशिल योग्य असल्याचे खात्री करुन राज्यस्तरीय CMEGP सेल यांना कर्ज वितरण व अनुदान वितरणासाठी प्रस्ताव सादर करण्यात येतात.
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती CMEGP सेल कडून प्रस्तावाची छाननी होऊन नोडल बँकेच्या मार्फत राज्य शासनाचे मार्जिन मनी अनुदान रक्कम संबंधित बँकाना वितरीत करण्यात येतात. मार्जिन रक्कम ही बँकद्वारा 3 वर्ष कालावधीसाठी संबंधित कर्ज खात्याच्या नावे डिपॉझिट करण्यात येते. 3 वर्ष कालावधी पूर्ण झाल्यानंतर जिल्हा समितीच्या मान्यतेने राज्य शासनाचे मार्जिन रक्कम अनुदान संबंधित कर्ज खात्यावर जमा करण्यात येते.
*मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे*
1) पासपोर्ट फोटो
2) आधार कार्ड
3) पॅनकार्ड
4) बँक पासबुक
5) जात प्रमाणपत्र असल्यास
6) मार्क्सशीट / शाळा सोडण्याचा दाखला
7) डोमेसाईल प्रमाणपत्र/ जन्म दाखला
8) अर्जदार अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र
9) प्रोजेक्ट रिपोर्ट
10) उद्यम रजिस्ट्रेशन
11) शॉप ॲक्ट लायसेन्स
*मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत उद्योग*
·फॉब्रीक्स उत्पादन | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
·लॉन्ड्री | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
·बारबर | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
·प्लंबिंग | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
·बॅटरी चार्गिंग | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
·आर्ट बोर्ड पेंटिंग / स्प्रे पेंटिंग | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
·बॅन्ड पथक | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
·ऑफिस प्रिंटींग / बुक बाईंडिंग | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
·फर्निचर बनविणे | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
·ट्रंक आणि पेटी उत्पादन | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
·रेडीओ उत्पादन | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
·कॉम्पुटर असेंम्बली | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
·वेल्डिंग वर्क | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
·सिमेंट प्रॉडक्ट | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
·प्रिंटींग प्रेस | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
·बॅग उत्पादन | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
·मंडप डेकोरेशन | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
·मिठाईचे उत्पादन | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
·खेळणी बनविणे | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
·सजावटी बल्बचे उत्पादन | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
·पार्लर
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत website नाही किंवा कोणत्याही शासनाच्या योजनेशी संबधित नाही,कृपया याला official website म्हणून मानु नका.या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवाअधिकार्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो.धन्यवाद..